ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

📚♻ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी📚
सर्व  माहिती pdf मध्ये डाऊनलोड करा. 
Download 

कधी असला बायोडाटा वाचला आहे का?

(1891-1956)

B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,
D.Litt., Barrister-at-La w.
B.A.(Bombay University)
Bachelor of Arts,
MA.(Columbia university) Master
Of Arts,
M.Sc.( London School of
Economics) Master
Of Science,
Ph.D. (Columbia University)
Doctor of philosophy ,
D.Sc.( London School of
Economics) Doctor
of Science
L.L.D.(Columbia University)
Doctor of
Laws 
D.Litt.( Osmania University)
 Doctor of
Literature
Barrister-at-La  (Gray's Inn,
London) law
qualification for a lawyer in
royal court of
England.
Elementary Education, 1902
Satara,
Maharashtra
Matriculation, 1907,
Elphinstone High
School, Bombay Persian etc.,
Inter 1909,Elphinston 
College,Bombay
Persian and English
B.A, 1912 Jan, Elphinstone
College, Bombay,
University of Bombay,
Economics & Political
Science
M.A 2-6-1915 Faculty of Political
Science,
Columbia University, New York,
Main-
Economics
Ancillaries-Soc iology, History
Philosophy,
Anthropology, Politics
Ph.D 1917 Faculty of Political
Science,
Columbia University, New York
'The
National Divident of India - A
Historical and
Analytical Study'
M.Sc 1921 June London School
of
Economics, London 'Provincial
Decentralizatio n of Imperial
Finance in
British India'
Barrister-at- Law 30-9-1920
Gray's Inn,
London Law
D.Sc 1923 Nov London School, 
of
Economics, London 'The
Problem of the
Rupee - Its origin and it's,
solution' was
accepted for the degree of D.Sc.
(Economics).
L.L.D (Honoris Causa) 5-6-1952
Columbia
University, New York For HIS
achievements,
Leadership and authoring the
constitution of
India
D.Litt (Honoris Causa)
12-1-1953 Osmania
University, Hyderabad For HIS
achievements,
Leadership and writing the
constitution of
India!
Name

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञांना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली.
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते. इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!
यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे. त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !
हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले. जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे. 
📚📕📖संविधान बाबासाहेब ने ही क्यों लिखा और कोई दूसरा क्यों नही लिख सका ???पढ़िए और चार लोगो में सर उठाकर बताइए....
 बाबासाहब नं.१ थे 
गांधी भी Barrister थे, 
नेहरु भी Barrister थे,

राजगोपालाचारी, 
मुंशी, 
बी. एन. राव , 
जे . पी. कृपलानी 
ऐसे बहुत सारे लोग थे । 

फिर बाबासाहब को ही संविधान क्यों लिखना पड़ा...?

1946 मे Constitution Assembly के election हुए , 
नेहरु और पटेल ने ये declare किया था कि ,

 "हमने संविधान सभा के सारे दरवाजे , खिडकिया बंद कर दिये हैं, देखते है बाबासाहब कैसे अन्दर आते हैं?" 

ये उस वक्त की political स्थिति थी । 

क्योंकि वो सब लोग जानते थे कि " बाबासाहब वो व्यक्ति हैं जो हमारी 
कोंग्रेस को नहीं मानते, 
गांधी को नहीं मानते, 
नेहरू को नहीं मानते 
और 
पुरे देश और दुनिया मे इनकी अपनी एक position है । 

Constitution तो वह तब लिखेंगे जब वे संविधान सभा मे आयेंगे , हम उनको संविधान सभा मे आने हि नही देंगे , हम उन्हे जीतने ही नहीं देंगें ..." ऐसा Open Declaration वल्लभभाई पटेल ने दिया था...!

इसलिये बाबासाहब को संविधान सभा मे जाने के लिये ventilator के सहारे जाना पडा, वो ventilator था,

"जैसुर-खुलना" बंगाल का इलाका, वहा से बाबासाहब को लड़ना पडा और बाबासाहब संविधान सभा मे चुने गये 

3 जुन 1947 मे भारत और पाकिस्तान का बंटवारा करके बाबा साहब का वह इलाका पाकिस्थान के हवाले जान बूजकर किया गया था। 

बाबासाहब कांग्रेस की गद्दारि से पाकिस्थान सविधान सभा के मेंबर बन गए थे।

तब बाबासाहब ने प्रेशर से काम किया । 

उस वक्त भारत मे 560 रियासतों में से हैद्राबाद, भोपाल, त्रवनकोर, कोल्हापूर, इनको भारत मे कैसे शामिल किया जाये , इनका Constitutional Settlement कैसे किया जाये इसके लिये British Cabinet की Meeting हुई ।

हैदराबाद, त्रावनकोर, कश्मीर इन तीनों राज्यों ने ये declare किया कि, हम भारत मे शामिल नहीं होंगे, हम पाकिस्तान की तरह स्वतंत्र होंगे । 

उस वक्त नेहरु, पटेल और गांधी किसी को ये समझ मे नहीं आ राहा था कि, इन 560 रियासतों को किस तरह settlement किया जाये..! 

17 जुन 1947 में बाबासाहब ने International Press को संबोधित किया । 

जिसमें उन्होने तीन बाते बोली.... 

1) ब्रिटिश पार्लियामेंट को भारत के राज्य के संप्रभुता, सार्वभौम के उपर Law बनाने का कोइ अधिकार नहीं हैं ! ऐसा कोइ International Law नहीं हैं । जिसके तहत ये राज्य भारत मे रहेंगे, या नहीं रहेंगे ये decide करने का अधिकार और power ब्रिटीश पार्लियामेंट के पास नहीं हैं..!

2) और इन सारे राज्यों के राजाओ से अपिल है कि, "अगर तुम सोचते हो कि आप सयुक्त राष्ट्र मे जाओगे , और सयुक्त राष्ट्र भारत की सार्व भौमिकता नजर अंदाज करके आपको Independence बनायेगा तो आपसे बडा नासमझ कोइ नहीं है..! " 

3) इन सारे राजाओं को बाबासाहब ने कहा, " आप सभी भारत मे शामिल हो जाओ , हम इसी देश के अंदर आपका Constitutional Settlement कर सकते हैं और हम एक बडा राष्ट्र बना सकते हैं..!" और यह सब बाबासाहब ने तब कहा था, जब नेहरु, गांधी और पटेल को समझ मे नहीं आ रहा था कि इन राज्यों का Integration कैसे किया जाये ...! 

बाबासाहब आंबेडकर को संविधान लिखने का मौका क्यूं मिला इसके दो मुख्य कारण हैं.. 

1) उस समय बाबासाहब से बडा Constitutional expert, Constitutional philosopher दुनिया मे कोई नहीं था ....1927 Bombay legislative council से लेकर labour Ministry, Constitute assembly तक जो बाबासाहब आंबेडकर ने विविध legislative के काम किये थे उसे पूरी दुनिया जानती थी ! 
Govt. Of India act 1935 जो बना उसके लिये जो तीन Rountable Conferences हुइ उसमें बाबासाहब ने जो views दिये थे । उनका 50% amendment Govt. Of India act 1935 मे हूआ था ! 

2) मुसलमानों के बाद भारत में दूसरा सबसे बडा Minority, 
schedule caste था, 
और बाबासाहब आंबेडकर ने ये stand लिया था कि, अगर बनने वाले संविधान में हमारे संवैधानिक अधिकार सुरक्षित नहीं रखे गये तो, वह संविधान हमें मंजूर नहीं होगा । 

नेहरू और गांधी को ये डर था कि, यदि partition of India हुआ और उसके बाद अगर संवैधानिक solution नहीं मिला, तो भारत के 560 टुकडे हो सकते हैं । 

भारत का balkanization हो सकता हैं । और अगर ये हमे रोकना हैं, तो एक ही आदमी इस देश को बचा सकता है, और वो हैं Dr बाबासाहब आंबेडकर..... 
और 
इसलिए Dr. बाबासाहब आंबेडकर को संविधान लिखने का मौका मिला ... 

संविधान सभा मे Drafting कमैटी को मिलाकर total 23 कमैटीया बनीं । 
जिसमें से २० कमैटी पे अकेले बाबासाहेब ने ही कामकिया और संविधान का ड्राफ्ट 141 दिनों मे तैयार किया । 

इससे ये मालुम होता हैं कि बाबासाहब दुनिया के सबसे बडे Constitutionality Expert थे....।

Drafting कमैटी मे जितने लोग थे उनमे से 
कोइ बिमार हूआ, 
कोइ छुट्टी पर चला गया, 
कोइ विदेश गया , 
कोई अपने घर के कामों में व्यस्त रहे ।
किसी ने रिजाईन की वह जगह खाली वह रही । 

इसलिये खुद टि. टि. कुश्नमाचारी बोले कि " पूरा संविधान बनाने का काम अकेले बाबासाहब पर आ गया और उन्होने उसे बहुत खूबी से निभाया !" 

इसलिये 1950 के बाद नया भारत बना।
                                                 मी माझा निश्चय करून टाकलेला आहे. मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे. माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारच्या ऐहिक लाभाकरिता नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही कि अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करून घेता येणार नाही. माझ्या धर्मांतराच्या मुळाशी अध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसली हि भावना नाही. हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही. हिंदू धर्म माझ्या स्वाभिमानाला रुचू शकत नाही. तुम्हांला मात्र अध्यात्मिक तशेच ऐहिक लाभाकारीता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे. काही लोक ऐहिक लाभाकरिता धर्मांतर करण्याच्या कल्पनेस हसतात व तिचा उपहास करतात. अश्या लोकांना मूर्ख म्हणण्यात कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही. मेल्यावर आत्म्याचे काय होईल व काय न होईल , हे सांगणारा धर्म श्रीमंताच्या उपयोगाचा असेल. फावल्या वेळी अश्या धर्माचा विचार करून मनोरंजन करता येईल. जिवंतपणी ज्यांनी सौख्य भोगले त्यांना आपण मेल्यानंतर आपणास सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म असे वाटणे अगदी साहजिकच आहे. पण ज्यांची अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राखरांगोळी झाली आहे, जे अन्नवस्त्राला मोताद झाले आहेत, ज्यांची माणुसकी नाहीसी झाली आहे, त्या लोकांनी धर्माचा ऐहिकदृष्ट्या विचार करू नये तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहत राहावे ? या गर्भश्रीमंत रिकामटेकड्यांच्या वेदांताचा गोरगरिबाला काय उपयोग ?
मी तर तुम्हांला असे स्पष्ट  सांगू इच्छितो की , माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा, संघटना करावयाची असेल तर धर्मांतर करा, सामर्थ्य संपादन करावयाचे असेल तर धर्मांतर करा, जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता ? जो धर्म तुम्हांला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ? जो धर्म तुम्हांला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ? जो धर्म तुम्हांला पाणी मिळू देत नाही त्य धर्मात तुम्ही का राहता ? जो धर्म तुमच्या नौकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता ? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ? ज्या धर्मात मानसासी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शीरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे ! ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असताना चालतो , पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये असे सांगतो, तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा , निर्धनांना निर्धन राहा असी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.
धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटल्याशिवाय धर्मांतर करू नये , असे माझे मत आहे आणि त्यामुळे कोणाचीही वृत्ती साशंक राहू नये व कोणाच्याही मनात किंतु राहू नये ; लोकांचे भले कशात आहे व वाईट कशात आहे हे जो निर्भयपणे व निर्भीडपणे, लोकापवादाची पर्वा न करता मांडतो त्यालाच मी पुढारी मानतो. तुमचे हित कशात आहे हे सांगणे माझे कर्तव्यकर्म आहे. माझे कर्तव्यकर्म मी केले आहे. आता माझ्या प्रश्नांचा निर्णय करणे हे कर्तव्यकर्म तुमचे.तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे.परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे , या भावनेला वश होवून काही करू नका. तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या . माझ्याबरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केलात तरी त्याबद्दलही मला काही दुखः होणार नाही. उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणून मला आनंद वाटेल. हा निर्वाणाचा प्रसंग आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवालच .
तुमच्या भावी पिढीची भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार आहे. तुम्ही आज स्वतंत्र होण्याचा निश्चय जर केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल, तुम्ही आज पराधीन राहण्याचा निश्चय केला तर भावी पिढीसुद्धा पराधीन राहील, म्हणून तुमची जबाबदारी अत्यंत कठीण आहे.
          
:🌀" जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा कि तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे."

📕📚विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

आज समाजावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराचाराला रोखण्यासाठी आपल्याला सत्ता हस्तगत करावीच लागेल. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि देशाचा राजा ज्या समाजाचा असतो त्या समाजावर कधीच अन्याय अत्याचार होत नाही. बाबासाहेबांनी ह्या देशाला संविधान बहाल करून लोकशाही प्रस्थापित केली, पूर्वी देशाचा राजा हा राणीच्या पोटातून पैदा होत होता परंतु आज बाबासाहेबांमुळे देशाचा राजा हा तुमच्या आमच्या मताने पैदा होतो. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला मतदान नावाचे शस्त्र दिले आहे हे शस्त्र  जर आपण योग्य वेळी वापरलं तर नक्कीच आपल्या समाज शासनकर्ता बनल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला शासनकर्ते होण्यास सांगितले पण आपण कधीच शासनकर्ते होण्याचा विचारच केला नाही. गल्ली, शहर आणि राज्य इथपर्यंतच राजकारण करण्याची सवय आपल्या गटा तटांना आहे. त्याच्यापलीकडे जाऊन देश पातळीवर राजकारण करण्याची धमक कुठल्याही गटा तटात नाही. हि वस्तुस्थिती आहे. इथल्या तथाकथित पक्षांनी कितीही बोंबा मारल्या कि आम्ही देश पातळीवर काम करतो तरी काही फायदा नाही कारण यांना महाराष्ट्राबाहेर कुणीही  ओळखत नाही. संपूर्ण भारतामध्ये बहुजनांचे नेतृत्व करणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त बहुजन समाज पार्टी आहे आणि त्यामुळेच शाहिद रोहित वेमुलाच्या आईने बहुजन समाज पार्टी चा प्रचार करण्याचा निर्णय केला आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबांना डोक्यावर घेतलेले आहे परंतु डोक्यात घेतले नाही. आपण बाबासाहेबांची भक्ती करतो परंतु त्यांच्या विचारांचे अनुकरण करत नाही आणि त्यामुळेच आपल्या भावनिकतेचा फायदा घेऊन जातीवादी लोक सत्तेत येतात. आपण पण काय करतो ? ज्या सनातनी आर एस एस च्या विरोधामध्ये आपले सगळेच गट तट काम करत असतांना, आर एस एस हा एकमेव आपला शत्रू असतांना सुद्धा आपण त्यांनाच धम्माच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावितो, इंदू मिल च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला ह्याच जातीवादी लोकांना बोलावितो. 
अरे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही विरोधकांनाच बोलावतात मग त्यांचा विरोध तरी कशाला करता ? आज महाराष्ट्रात ह्या गटा तटाच्या हलकट राजकारण्यांमुळे आपण सत्तेपासून वंचित आहोत. आता आपल्याला एक पक्ष, एक झेंडा, एक नेता निवडण्याची खरी वेळ आली आहे. अजून किती दिवस आपण निगेटिव्ह विचार करत बसणार ? आपण नेहमीच म्हणतो कि महाराष्ट्रातील आपल्या समाजाच्या मतदानावर आपण सरकार बनवू शकत नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे? हा आपला नकारात्मक विचार आहे हे आपल्या लक्षात केव्हा येईल?? प्रत्येक समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणेच जर सरकार बनले असते तर ब्राह्मण समाज कधीच सत्तेत आला नसता कारण त्यांची लोकसंख्या फक्त 3% आहे आणि आपल्या समाजाची संख्या त्यांच्यापेक्षा जास्तच आहे. एवढे साधे गणित आपल्याला कळत नाही. 
       📚🙏🏻महाराष्ट्रातील लोकसंखेच्या दोन टक्के सुद्धा मतदान  न मिळणाऱ्या पक्षांची व त्यांच्या नेत्यांची आता कोंडी झाली आहे. त्यांना माहित आहे कि येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे अस्तित्व संपणार आहे. इतिहास साक्षी आहे ज्यांनी बाबासाहेबांशी गद्दारी केली ते कधीच यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे ह्या सर्व २ टक्क्यांच्या पक्षांचे धाबे दणाणले आहेत. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बापाशी गद्दारी करणाऱ्या ह्या औलादिंना मातीत गाडण्याची वेळ जवळ येत आहे. डॉ बाबासाहेब म्हणाले होते कि "कमुनिस्टांची विचारधारा देशाला घातक आहे" तरी सुद्धा काही आंबेडकरवादी पक्ष कमुनिस्टांची साथ देवून समाजाची दिशाभूल करीत आहेत. डॉ बाबासाहेब म्हणाले होते कि "कोन्ग्रेस हे जळत घर आहे त्याचे चार आण्याचे सुद्धा सदस्य होवू नका" तरी सुद्धा काही आंबेडकरवादी पक्ष कोन्ग्रेस चे पाय चाटण्यात व्यस्त आहेत. देशात आंबेडकरवादाचा खरा शत्रू जर कुणी असेल तर तो आर.एस.एस. व भाजपा आहे तरी सुद्धा काही आंबेडकरवादी पक्ष भाजपच्या नांदी लागून गुलाम झाले आहेत. 
अशा स्वार्थी नेत्यांनी सगळ्यांनी मिळून 'युती' जरी केली तरी यांची लायकी २ टक्क्यापेक्षा जास्त नाही. म्हणून समाजाने आता जागृत झाले पाहिजे व येणाऱ्या निवडणुकीत समाजाचे मित्र व शत्रू यातील फरक ओळखून बाबासाहेबांच्या विचारला पुढे घेवून जाणाऱ्या बहुजन समाज पक्षालाच मतदान करून शासनकर्ती जमात बनले पाहिजे. शाहिद रोहित वेमुला यांच्या आईने घेतलेल्या निर्णयाचे मनापासून स्वागत व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते आणि त्यांना ही कुशाग्र बुद्धी आणि तल्लख स्मरणशक्ती ईश्वरदत्त नव्हे तर आपल्या प्रचंड मेहनतीने मिळाली होती.

बी.ए., डबल एम.ए., पीएच. डी., एम.एस्‌‍सी., डी.एस्‌सी., एल्‌एल.डी., बार-अॅट-लॉ अशा एकूण एकूण ३२ पदव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादित केलेल्या आहेत.

📖📚डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ २० व्या शतकातील सर्वात बुद्धिमान भारतीय होते असं नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती आहेत. २० व्या शतकात जगभरात अनेक प्रचंड बुद्धीचे व्यक्ती होऊन गेलेत त्यातही बाबासाहेब नाव अगदी सर्वात वरच्या स्थानावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नुकतेच जगातील सर्वात महान प्रतिभावंत (बुद्धिवंत) म्हणून इंग्लडच्या केब्रिज यूनिवर्सिटीने घोषित केले आहे. त्यांनी बाबासाहेबांवर संशोधन केले आणि त्यातून समोर आले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल ६४ विषयांत मास्टर होते. आणि एवढ्या संख्येच्या विषयांवर प्रभुत्व असणाऱ्या बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या जवळपासही कुणाची प्रतिभा किंवा एवढ्या विषयांत प्रभुत्व नाही. जागतिक इतिहासात सर्वात जास्त ज्ञानसंपन्न मणुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. सिम्बॉल ऑफ नॉलेज (ज्ञानाचे प्रतिक) म्हणूनही बाबासाहेबांचा गौरव केला जातो.
📕📚 भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख करावी लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.
♻ बी.ए. (बॅचेलर ऑफ आर्ट्स)
बाबासाहेब तथा डॉ. बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला..
महाराज बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर अत्यंत प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे दि. ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकार्‍यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८/४/१९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत दि. १५/६/१९१३ ते १४/६/१९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बोटीने प्रवास करून डॉ. आंबेडकर दिनांक २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता न्यूयॉर्क येथे पोहचले.
बडोदा संस्थानचे स्कॉलर असलेले बाबासाहेब परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले. राज्यशास्त्र शाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे निवडले. न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या हाईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४ वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले, कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील त्यांचा एक वर्गमित्रसुद्धा तिथेच होता.

एम.ए. (मास्टर ऑफ आर्ट्स)
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २/६/१९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात पुढे पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध झालेले लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. बाबासाहेब ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. लाला लजपतराय हे लंडनहून न्यूयॉर्कला आलेले होते. असेच एकदा या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असताना प्राध्यापक सेलिग्मन तिथे आले. प्रा. सेलिग्मन यांचे संपूर्ण नाव एडविन रॉबर्ट अॅन्डरसन सेलिग्मन होय. त्यांनीसुद्धा या दोघांच्या संवादात भाग घेतला. प्राध्यापक एडविन सेलिग्मन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले, "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सर्वाधिक बुद्धिमान विद्यार्थी आहेत."

प्रा. सेलिग्मन ज्यूधर्मीय होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पी.एच्.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबाबत म्हणतात, ‘अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्‍तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा. सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील १९१३ ते १९१६च्या वास्तव्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक आले. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना आंबेडकरांना अनेक विद्यार्थ्यांना कोलंबिया विद्यापीठात प्रा. एडविन सेलिग्मन यांच्याकडे पाठवले होते.

पीएच.डी.
‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ The National Divident of India  : A Historical And Analytical Study. हा बाबासाहेब आंबेडकरांचा पीएच.डी.साठीचा विषय होता. त्यांनी १९१३ ते १९१७ या कालावधीत विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध लिहिला. अवघ्या २५ वर्षांच्या भीमराव आंबेडकरांनी एवढ्या गहन विषयावर प्रबंध लिहून ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकून, अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन करून जगातील सर्व देशांचे लक्ष या प्रबंधाकडे वेधून घेतले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध लिहिला. प्रा. सेलिग्मनसारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने या प्रबंधाचा गौरव केला. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. आला. ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ (Evolution of Provincial Finance in British India). हा ग्रंथ त्यांनी उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना आदरपूर्वक अर्पण केला. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. या ग्रंथात ब्रिटिशांवर प्रखर टीका करून आपण खरे राष्ट्रभक्त असल्याचे २६ व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले.
दिनांक ९ मे १९१६ रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी Caste in India. Their Mechanism, Genesis And Development हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या सार्‍याच विद्वानांचे लक्ष वेधले. The American Journal of Sociology या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङ्मय’ World’s Best Literature Of The Month या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या सन्मानार्थ कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांनी आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सनातनी समाजरचना विरुद्ध आधुनिक समाजरचना या विषयावर मोठा खल होत असे. या परिसंवादांमध्ये डॉ. आंबेडकर भाग घेत असत. मानववंशशास्त्रांच्या (Anthropolopy) शाखांमार्फत चालणार्‍या या चर्चांमध्ये विद्वत्ताप्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात होते. त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांतील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धान्त उभा केला.
अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातले चित्र आणि अमेरिकेतील चित्र वेगवेगळे दिसून आले. इथे शिवाशिवीचा/ अस्पृश्यतेचा प्रश्नच नाही, कोणत्याही प्रकारची मानहानी नाही. अमुक विषय घ्यायचा तमुक विषय घ्यायचा नाही असे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कारण अमुकच जातीत जन्म घेतला आहे. अमुक जातीतील जन्मामुळे केस कापणे, कपडे लाँड्रीला देणे, वाहनात बसू न देणे, पिण्याचे पाणी न देणे, शाळांमध्ये शिक्षक दुरून छड्या मारतात असे चित्र अमेरिकेत पहायला मिळत नव्हते. प्रोफेसर कितीतरी आत्मीयतेने शिकवत होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील विद्वान प्रोफेसर सेलिग्मन आणि प्रो. सिगर हे विद्यार्थी भीमरावांशी समतेच्या भूमिकेवर चर्चा करत असत आणि शिकवत असत. या घटनांतूनच डॉ. आंबेडकरांना नवचैतन्य प्राप्त झाले. समतेची मिळालेली अमेरिकेतील वागणूक डॉ. आंबेडकरांच्या मनावर खोलवर बिंबली होती. त्यामुळेच पुढे भारतात आल्यावर त्यांनी समतेवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सारे सामाजिक लढे केलेले दिसून येतात.
अमेरीकेत असताना डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. बाबासाहेबांनी आपला विषय ठरवला - ‘भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता’. हे वर्ष होतं १९१६ आणि तेव्हा बाबासाहेब हे केवळ २५ वर्षांचे वर्षांचे होते.

वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.

जातिसंख्या मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. मनून जातिचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्विक आणि धार्मिक अधिष्ठात प्राप्त करून दिले.

जानेवारी ४, १९२८ च्या टाईम्स ऑफ इंडियात इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणूकीबद्दल वृत्तांत आला होता. त्याची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाई रिजनाच्या स्थितीशी केली.

आपल्या सावलीमुळे हिंदू भ्रष्ट होवू नयेत म्हणून पेशवाईत अस्पृश्याला सार्वजनिक रस्ते वापरण्याची बंदी होती. अस्पृश्याने चुकूनही आपला विटाळ होवू नये म्हणून गळ्यात किंवा हाताला काळा दोरा बांधावा असा दंडक होता. त्यामुळे त्याची अस्पृश्य म्हणून ओळख पटत असे. पुणे ही पेशव्यांची राजधानी. पुण्यात ज्या जमिनीवर अस्पृश्य चालेल ती जमीनसुद्धा शुद्ध व्हावी यासाठी अस्पृश्यांना कमरेत एक केरसुणी झाडू लटकवावी लागत असे. असेच अस्पृश्यांची थुंकी रस्त्यात पडली आणि त्यावर चुकून एखादा सवर्ण हिंदूचा पाय पडला तर, तो अपवित्र होवू नये म्हणून थुंकी गोळा करण्यासाठी अस्पृश्याला गळ्यात एक मडके लटकवावे लागत असे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जात’ या विनाशक संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही ‘श्रमविभागणी’ वरही अवलंबून नाही आणि ‘नैसर्गिक कल वा योग्यतेवरही’ अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. मुळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडीलांच्या सामाजिक स्थानानुसार.
भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे हि चांगली गोष्ट आहे.
पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी 
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे.
पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे.

त्यांच्या विचारांची अमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच कोणी तरी लाटत आहेत.

त्यांचे ते कार्य प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचावे.
त्यांच्या अद्वीतीय आणि महत्वपुर्ण कार्याचा आढावा घेनारा हा विस्तृत लेख.

1)भारताची चलन व्यवस्थेचे मार्गदर्शक.1923/1925
2)भारतीय रिजर्व बँकेच्या स्थापणेचे मार्गदर्शक.1934
3)भारताचे संविधान लेखक.1949
4)भारतीय 14 वित्त आयोगाचे दिशादर्शक.1951
- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

वरील 4 गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत.
आणि त्या सर्व गोष्टींचा पाया हा बाबासाहेबांचे विचार आणि लिखाण आहे.
वरील 4 गोष्टींवरती आजपर्यंतचा भारताचा अर्थ कारभार आणि येनारा भविष्यातील अर्थ कारभार अवलंबुन आहे.

1)
The problem of the rupee:Its origin and its solution.1923 - Dr.Babasaheb Ambedkar

बाबासाहेबांनी 1923 साली त्यांच्या "डाॅक्टर आॅफ सायन्स"
ह्या पदवी साठी "लंडन स्कुल ऑफ ईकोनाॅमिक्स" ह्या विश्वविद्यालयात शिकत असताना लिहलेला प्रबंध.

या आपल्या प्रबंधात डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांनी 
"चलन" दर दहा वर्षानी बदलने आणि ते अचानक बदलने.
हे मुद्दे 93 वर्षापूर्वीच लिहून ठेवले आहेत.

ज्यामुळे भ्रष्टाचार आणि ब्लैकमनी रोखता येऊ शकतो असे ईशारे त्यांनी अगोदरच दिलेले आहेत.

2)
Reserve Bank Of India.1934 - Dr.Babasaheb Ambedkar

भारतीय रीजर्व बँकेची स्थापना हि ब्रिटीश काळात
Reserve Bank Of India Act 1934 साली झाली.

त्या पुर्वी 1926 साली 
Royal Commission on Indian Currency and Finance, also known as the Hilton–Young Commission.
हे कमिशन भारतात रिजर्व बँकेच्या स्थापनेसाठी इग्लंड हुन भारतात आले होते.

Reserve Bank Of India.
ची संकलपणा,मार्गदर्शक तत्वे,कार्यपद्धती व दृष्टीकोण हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी "हिल्टन यंग कमिशन" ला 1926 साली दिलेली साक्ष ह्या वरतीच.
 पुढे रिजर्व बँक आॅफ इंडिया ची स्थापणा 1934 साली झाली.

त्या "हिल्टन यंग कमिशन" मधील जो प्रत्येक पदाधीकारी होता त्याच्या प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचे "The problem of the rupee its origin and its solution" हेच पुस्तक होते.

3)
"Finance Commission of India.1951
"भारतीय वित्त आयोग"

"भारतीय वित्त आयोग" ची स्थापण 1951 साली झाली.

भारतीय वित्त आयोगाचे काम हे आहे कि देशातील केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही घटकांमध्ये भारत सरकारकडे येनार्या सर्व करांच्या स्वरूपातील महसुल आणि ईतर ठिकाणांहुन येनारा महसुल हा खुप मोठ्या प्रमाणात केंद्रा कडे पैश्याच्या स्वरूपातुन जमा होतो.
तर त्याचे प्रत्येक 5 वर्षांनी व्यवस्थापण करणे गरजेचे असते.

Finance Commission Of India ची स्थापण ही.
THE EVOLUTION OF PROVINCIAL FINANCE IN BRITISH INDIA.1925- Dr.Babasaheb Ambedkar

हा बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापिठा मध्ये Phd साठी चा प्रबंध आहे.
ह्या प्रबंधा च्या आधारेच भारतीय वित्त आयोगाची स्थापणा झाली आहे.आणि आज पर्यंत सर्व 14 वित्त आयोग हे त्याच पुस्तकाच्या आधारे करन्यात आले आहेत.

ही माहीती तर भारतातील अर्थतज्ञांना पण अजुन ज्ञात नाही आहे तर लोकांना ती कधी समजनार हिच मोठी शोकांतीका आहे.

बाबासाहेब हे भारतातील अर्थतज्ञांपैकी सर्वाधिक जास्त शिकलेले ते ही जगातील सर्वोच्च विद्यापीठांतुन अर्थशास्त्र ह्या विषयांत सर्वाधिक जास्त Phd केलेले एकमेव व्यक्ती आहेत.

मला आवर्जुन सांगायचे आहे कि हे सर्व लिखान त्यांनी जवळपास शंभर वर्षांपुर्वी केलेले आहे आणि त्या जमान्यात.
टि.व्ही,इंटरनेट,मोबाईल,काॅम्पुटर ह्या सोई सुविधा जन्मल्या नव्हत्या.
तरी सुद्धा बाबासाहेबांनी जगातिल सर्वाधिक सुंदर आर्थशास्त्रत लिखान केले आहे.
येनार्या 1000 वर्षा पर्यंत ह्या लिखानाला महत्व असेल..
सरकार कितीही बदलतील पण त्या सरकारचे मार्गदर्शक हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच असतिल.
so we called him "The Father Of Modern India"

बाबासाहेबांच्या ह्या महान कार्याला माझे शतःकोटी प्रणाम. 📚🌐२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, " आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे." ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व 'कार्ल मार्क्सचे ' 'दास कॅपिटल ' या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ' buddha & his dhamma ' या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. आणि नानकचंद ला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले .दिनांक ४ डिसेंबर ला बाबासाहेब सुमारे ८-४५ ला उठले . सकाळी सुमारे ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत विचारविनिमय करावा अशी विनंती केली.बाबासाहेब त्यांना म्हणाले, ' यासंबंधी आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू .

दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma ' या ग्रंथांचा मजकूर लिहित होते ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद संध्याकाळी ५-३० आले त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात 'बुद्धं शरणं गच्छामि ' त्रिशरण म्हणू लागले . नंतर त्यांनी नानकचंद ला 'बुद्ध भक्तिगीते 'हि रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले ' जेवणाची इच्छा नाही ' पंरतु नानकचंद ने आग्रहाणे जेवावयास उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निःश्वास सोडला . आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतांना दोन घास खाल्ले .नंतर नानकचंद ला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले . मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले ," चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा."
त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते, चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंद ने जाण्याची परवानगी मागितली . ते म्हणाले " जा आता . पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा आहे ."
नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे ११-१५ झाले होते.

दिनांक ६ डिसेंबर ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठेल. ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला म्हणाला 'माईसाहेबांनी तुम्हांला लागलीच बोलावले आहे. नानाकचंद तसेच निघाले त्यांनी सुदामला विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे ? आणि बंगल्यावर पोहचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछान्याजवळ गेले आणि म्हणाले " बाबासाहेब मी आलोय ! असे भांबवून मोठयांदा ओरडले . साहेबांच्या अंगाला हात लावला त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ,तेव्हा कळून चुकले कि , बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे .
बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्यांदा रडू लागले. बंगल्यातील सर्व जण गोळा झाले माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतली आणि तोही रडू लागला .

पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी ९ वाजता फोन करण्यास सुरवात केली व सर्वांना हि बातमी कळविली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे हि बातमी मुंबईतील लोकांना कळली तेव्हा लोकांचे थवेच्याथवे विमानतळाकडे जाऊ लागले. दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले सांताक्रूझ विमानतळावर रात्री उतरले .तिथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती .अॅम्ब्यूलन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना घेत घेत अॅम्ब्यूलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला .'बाबा ! ' आणि ते रडू लागले .
स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको ! मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोकी आपटली, कित्येकजणी मुर्च्छित पडल्या.

हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागले . हिंदू कॉलनीतील लोकांनी , ' आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला ! आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले ! ' असे उद्गार काढले.

एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अत्यंदर्शनासाठी उभे होते.
बाबांचा पार्थिव देह राह्गृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडला हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पावित्र्यनिदर्शक अशी शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लक्ष ( लाख ) लोकांनी अंत्यदर्शन घेतले . बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लक्ष कामगारांनी हरताळ पाळला. त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या. अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळात भाग घेतला होता.

एका शृंगाररलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला .त्या मागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्याशेजारीच पुत्र यशवंतराव (उर्फ भय्यासाहेब आंबेडकर ) व पुतणे मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची लांबी सुमारे दीड ते दोन मैल होती. किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी ! पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली परळ नाक्यापासून मिरवणूक एल्फिन्स्टनरोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.बरोबर दिनांक ७ डिसेंबर ५ वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉ. बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता . बाबांचे शव ट्रकच्या खाली उतरविण्यात आले मेणबत्यांचे तबके घेतलेले चार भिक्षु पुढ होते. बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशाप्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला ते करूण दृश्य पाहतांना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला .यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिव शवाला सशत्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाजता अग्नी देण्यात आला बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच यांचे आप्तस्वकीय यांना संयम आवरता आला नाही ते चीतेकडे धावले ओक्साबोक्शी रडू लागले . व त्यांनी पुन्हा ' बाबांचे ' शेवटचे दर्शन घेतले. आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.

रविवार दिनांक ९ ला सकाळी ८ वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा झाली अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते. आणि अनेक वक्ते उपस्थितीत होते. अनेकांची भाषणे झाली श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात हे उद्गार काढले ' आम्हा तरुण सभासदांना डॉ. आंबेडकर यांच्या सान्निध्यात राहण्याचा अगर त्यांच्यबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मुळ तयार केली होती , ती उकृष्ट होती. आणि जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तीत्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप भारतात तेवत राहील .हिंदू समाजातील पिडीत व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कांसाठी लढण्यास उभे केले. त्याचप्रमाणे त्यांनी पददलितांबद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय.
त्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुद्धा भाषण केले ते म्हणाले या महान नेत्याच्या मृत्युच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ? मग त्याने इतिहास निर्माण करण्याऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर , इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली ? भारताला महापुरुषांची वाण कधी पडली नाही . परंतु असा युगपुरुष शतकाशतकात तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा ,महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर , बहाद्दर पुरुष आज मृत्युच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे.त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत.

चैत्यभूमी वदे सागरा ,

हे सागरा माझी विनवणी ऐक रे जरा
शांत करुनी तुझ्या त्या लाटा
दोन पावले मागे सरकून घे आता,
येईल निळ्या भीमसैनिकांचा अलोट गर्दीचा ताफा
चरण स्पर्श करण्या त्यांच्या बापाच्या बापा
जो घेत असे वर्षानुवर्षे येथे चिरकाल विसावा
करता लढाई मनुवाद्यांशी तो ना मागे सरला
बहुजन कोटी कुळांचा उद्धार करुनी तो होता दमला
भीम चरणावर टेकविताच भीमसैनिक माथा
उसळतील अश्रूंच्या निळ्या लाटाच लाटा
टाहो फोडुनी बाबा बाबा म्हणुनी मारतील रे हाका
करतील भीमगर्जना अन दणाणतील आसमंत सारा
भाग्यशाली मी उदरी माझ्या घेत आहे तो विसावा
या जगाच्या पाठीवर ना शोधून दिसे असा सितारा
तू ही या जगी मोठा भाग्यवान आहेस सागरा
तुला लाभला आहे माझ्या चैत्यभूमीचा पवित्र किनारा
ह्या एकमात्र सितारा मुळे पाहे आम्हा हा जग सारा
आम्हा आजही आठवितो ६ डिसेंबर १९५६ दिन तो काळा
सोडून गेला होता बहुजन कोटी कुळांचा एकमेव सहारा
महापरिनिर्वाण दिनी उसळला होता येथेच भीमसागर सारा
त्या अथांग सागराचा कोणत्याच दिशेला नव्हता किनारा
ऐकुनी महापरिनिर्वाण हृदयद्रावक संवाद चैत्यभूमी अन त्या सागरा
भीमसैनिक वाहतो अश्रूंची करुनी फुले त्या महान शिल्पकारा.......

भारतीय घटनेचे शिल्पकार , भारताचे पहिले कायदे मंत्री , भारतरत्न ,स्त्रियांचे उद्धारकर्ते, बोधिसत्व ,प .पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन .

बाबासाहेबांच्या शेवटच्या ५ वर्षातील खरी घटना.

संध्याकाळची ९ वाजताची वेळ, नानकचंद रत्तु
बाबासाहेबांना म्हणाले, मी घरी जातोय तुम्हाला पाहीजे त्या सर्व वस्तु इथे ठेवलेल्या आहेत आणखी काही पाहीजे असेल तर सांगा., 
बाबासाहेब म्हणाले जा तु पण सकाळी लवकर याच वेळेस ये. एवढं ऐकुन नानकचंद घरी निघुन गेले.
पुन्हा सकाळी बाबासाहेबांनी सांगितलेल्या वेळेस बरोबर ९ वाजता हजर झाले, बघतात तर बाबासाहेबांचे लिखाण चालुच आहे..
ते तसेच बाजुला गप्प ऊभे राहिले..साधारण १५ -२० मिनिटे झाले असतील, बाबासाहेबांची अचानक उभ्या राहीलेल्या नानकचंद वर नजर गेली आणि बाबासाहेब म्हणाले .....
नानकचंद तु अजुन इथेच ऊभा का जा लवकर आणि सकाळी लवकर ये...
हे ऐकुन नानकचंदाच्या डोळ्यात ... अश्रु तरळले ते बाबासाहेबांना म्हणाले ,,
अहो बाबासाहेब सकाळ झाली ..मी घरी जाऊन परत आलोय.
तुमची प्रकृती बरी नाही..,एवढं जागे राहुन काय लिहीताय?
बाबासाहेब म्हणाले माझा समाज झोपेत आहे मला जागीच रहावे लागणार...ज्या वेळेस तो जागा होईल, मी हे लिहीलेलं वाचेल आणि त्यानुसार वाटचाल करेल. त्या वेळेस मी झोपेन, तेंव्हा मला सुखाची झोप लागेल...

आजची समाजाची स्थिति बघुन वाटते, बाबासाहेब अजुन झोपलेच नसतील, त्यांना आजपर्यंत सुखाची झोप लागलीच नसेल 

महामानव बाबासाहेब आंबेडकर "बैरिस्टर" झाल्यावर, शाहू महाराज मुंबईतील डबक चाळीत बाबासाहेबांना भेटायला जातात. शाहू महाराज डबक चाळीत येताच बाबासाहेबांचे सहकारी बाहेर थांबलेले असतात. शाहू महाराज त्या सहकाऱ्याला सांगतात कि -

"जा आणि बाबासाहेबांना सांग कि मी त्यांना भेटायला आलोय."

तेवढ्यात बाबासाहेब घराबाहेर येतात, आणि बघतात तर काय साक्षात शाहू महाराज मला भेटायला माझ्या घरी आलेत. एक राजा माझ्या घरी मला भेटायला आला याचे बाबासाहेबांना खूप नवल वाटते. आणि बाबासाहेब म्हणतात कि, तुम्ही राजे आहात, तुम्ही छत्रपती आहात. तुम्ही जर मला सांगितले असते तर मीच कोल्हापूरला आलो असतो, तुमची भेट घेतली असती, तुम्ही येण्याची तसदी का घेतली? तेवढ्यात शाहू महाराज म्हणतात -

"आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे, परंपरेचे राजे तर कुणालाही होता येते ओ, 
पण बाबासाहेब ज्ञानाचे राजे कुणालाही होता येत नाही, तुम्ही ज्ञानाचे राजे आहात.
आणि, तुम्ही "बैरिस्टर" झाला आहात, म्हणून तुमची उद्या रथातून मिरवणूक काढणार आहोत. तुम्ही कोल्हापूरला या"

आणि मग इतिहास असा घडला कि एका राजाने म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांनी एका अस्पृश्य मुलगा "बैरिस्टर" झाला म्हणून रथातून मिरवणूक काढली आणि त्यांचा सन्मान केला।

या महान कर्तबगार राजाला आपण आरक्षणाचे जनक म्हणतो, कारण त्यांनी, केवळ जन्माने श्रेष्ठ मानल्या गेलेल्या समाजातील विशिष्ठ लोकांना जे सुखसमृद्धीचे जीवन उपभोगत येते तेच जीवन मोठ्या प्रतीष्ठेने बहुजनांच्या वाट्याला सुद्धा यावे म्हणून त्यांच्या संस्थानात ५०% जागा नोकरीत राखून ठेवणारे शाहू छत्रपती हे भारतातील 
(७००) संस्थानिकांमध्ये पहिले संस्थानिक होते.
सर्वात मोठी आनंदाची बातमी
भारतासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे, 
अमेरिकेने घोषित केले की 14 एप्रिल हा दिवस जागतिक "शिक्षण दिन" म्हणून पाळला जावा कारण या दिवशी जगत विख्यात  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आहे. या बद्दल अमेरिकेचे विशेष आभार. हा संदेश आपणास जेवढा पसरविता येईल तेवढा पसरवा. भारताला मिळालेला हा बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आणखी एक मोठा सम्मान आहे.


🌏🌍🌍🌍🌍🌍🌍

               सर्व भारतीयांची मान उंचावेल अशी आश्चर्यचकित करणारी बातमी..........

जगात ७ महापुरुषांमधुन प्रथम क्रमांकावर भारतीय
संविधानाचे लेखक
जगातील एक नंबर असलेले
विद्वान भारतरत्न,विश्वभुषण, बोधीसत्व डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांचे

🌍जगात सर्वात जास्त पुतळे
एकाच महामानवाचे आहेत
ते म्हणजे बाबासाहेब....

  👤 पुतळे खालील प्रमाणे 👤

▪अमेरिकेत -68
▪जपान -49
▪चीन-47
▪श्रीलंका-40
▪रशिया -30
▪थायलंड-25

          🇮🇳 भारतात 🇮🇳

▫महाराष्ट्र -30700
▫कर्नाटक -30058
▫उत्तरप्रदेश -11440
▫बिहार-9500
▫आंध्रा-78060
▫राजस्थान-5500
▫मध्य प्रदेश -63000
▫गोवा-4567
     
   धन्यवाद🙏🏻
सौजन्य-@Whatsapp

1 comment: