ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

अडथळ्यांची शर्यत

अडथळयाची शर्यत


    *🔹अडथळयाची शर्यत...!!!*
━━━━━━━━━━━━━━━━
          *आजच्या पिढीवर मोबाईल📱, काँप्यटर(संगणक)💻,लँपटाँप⌨,टी.व्हि?.?अ🖥,असा अनेक तंत्रज्ञानाचा प्रभाव पडला आहे.*
        *श्रीमंतांच्या बंगल्यापासुन🏠 ते गरीबांच्या झोपडीपर्यत⛺ पोहोचलेल्या टी.व्हि🖥.मुळे मुलांचे गृहपाठ कधीच पुर्ण होत नाही.* *त्यामुळेच कोन बनेगा करोडपती🏆 व हातिम ताई या दोन मालिकेतून मी अडथळयाची शर्यत⛹‍♀ हा उपक्रम घ्यावयाचे ठरविले.*

      *🔸उपक्रमाचा मुख्य नियम🔸*
*=====================*

*👉जसे हातीम ताईला सात प्रश्न सोडवायचे आसतात.पहिला प्रश्न सोडविल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नाकडे त्याला जाता येत नाही. हीच कल्पना घेऊन एक आडथळयांची शर्यत हा उपक्रम घेण्याचे ठरविले.*

    *🔘खेळासाठी प्रश्न खालीलप्रकारे👇🏻*
*=====================*

*1) 'क' ने सुरु होणारे 5 शब्द (5 काडँ) तयार करा.*
*2) 563×5=*
*3) 'S' या अक्षरांवर संपणारे   5 शब्द लिहा.*
*4)दिपावलीच्या 🎉शुभेच्छां साठी काडँ तयार करा.*
*5) सभोतालच्या एका व्यवसायिकाविषयी (सुतार,गवंडी,लोहार.इत्यादी) पाच ओळी लिहा.*
*6)तुला रस्त्यावर 500 रुपये मिळाले तर.*
     *(एका वाक्यात उपयोग)*
*7) शहरी व ग्रामीण सुविधातील फरक लिहा.*

*🔸उपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाहि🔸*
👇👇👇👇👇👇👇👇
*🔸प्रत्येक प्रश्नाचे 5 संच तयार करुन घेणे.*
*🔹प्रत्येक प्रश्नांचा संच समान अंतरावर पाच ठिकाणी ठेवायचा व 5 विद्यार्थ्यांना मैदानात स्पर्धेसाठी निवडायचे आणि स्पर्धा सुरू करायची.*
*🔸प्रत्येक प्रश्नसंचासमोर एक विद्यार्थी उभा करायचा जेव्हा स्पर्धा सुरू होईल त्यावेळी धावत आलेला स्पर्धेक विद्यार्थी काडँ घेऊन तो प्रश्न सोडवेल व त्या विद्यार्थ्यांकडे देईल.विद्यार्थी त्यांचे उत्तर तपासेल उत्तर जर बरोबर असेल तर त्याला पुढे जाऊ देईल. नाही तर त्याला तेथेच प्रश्नाचे उत्तर शोधत बसावे लागेल.*
*🔸जो विद्यार्थी सर्व प्रथम सात ही प्रश्न सोडवील तो विजयी होईल.*

  *🔹उपक्रमाचे फलित/फायदे🔹*
*====================* 👇👇👇👇👇
*1)या उपक्रमामुळे मुलांची स्पर्धा परीक्षेची तयारी होईल.*
*2)तत्परता,जिद्द,चिकाटी,मनोरंजनाला वाव मिळेल.*
*3)शारीरिक व बौद्धिक दोन्ही चाचण्या एकाच वेळी होतील.*
*4)विद्यार्थी लवकरात लवकर उत्तरे देण्यासाठी पुर्वतयारी करतील.*
*5) वाचण्याची,लिहण्याची,अचूक उत्तर देण्याची तयारी आपोआप होईल.*

No comments:

Post a Comment