ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

OTG केबल स्मार्ट वापर

OTG CABLE चा स्मार्ट फोनला विविध उपयोग (संपूर्ण मार्गदर्शन)


नमस्कार शिक्षकवृंद,
                      चला तंत्रस्नेही बनुया या भागात आज आपणास मी OTG cable चा उपयोग स्मार्ट फोन ला आपण कुठे कुठे व कशा करू शकतो ह्या संबधी मार्गदर्शन करणार आहे.तंत्रस्नेही शिक्षकास याचा नक्कीच फायदा/लाभ होईल.

★★★★मनेश दारकुंडे★★★★


OTG म्हणजे काय? - याचा अर्थ फक्त ON-THE GO- CABLE असा आहे.बाजारात OTG CABLEची कीमत रु.50 पासून ..........

OTG CABLE चा वापर आपण हा स्मार्टफोन जसे की अँड्रॉइड व WINDOWS फोन साठी करू शकतो.OTG CABLE चा वापर आपण अनेक प्रकारच्या उपरकणासाठी करू शकतो जसे की-

1.PENDRIVE : -
                           PENDRIVE मध्ये साठवलेली माहिती जसे की - फोटो,विविध शैक्षणिक व्हिडीओज,PDF फाइल्स,वर्ड फाइल्स,पॉवरपॉइंट प्रसेंटशन,गाणी इत्यादी.कृती अगदी सोपी आहे OTG CABLE चा एक पोर्ट मोबाईल ला CONNECT करावा व दुसऱ्या पोर्ट मध्ये PENDRIVE कनेक्ट करावा.नंतर आपोआप PENDRIVE मधील फाइल्स आपल्या फोन वर दिसतील. न दिसल्यास मोबाईल मधील SETTING मध्ये जाऊन STORAGE फोल्डर शोधावे.

2.MOUSE :-
                     संगणकाचा MOUSE आपण आपल्या मोबाईल ला जोडू शकतो व संगणका प्रमाणे फोन वर काम करू शकतो.

3.KEYBOARD :-
                           संगणकाचा की बोर्ड सुद्धा आपण OTG CABLE च्या साह्याने फोन ला कनेक्ट करू शकतो तसेच KEYBOARD जश्या प्रकारे संगणकावर काम करतांना वापरतो तसाच वापर आपण फोन वर करू शकतो.

4.कार्ड reader : -
                           Micro मेमरी कार्ड(mobile) तसेच macro मेमरी कार्ड(camera) चे कार्ड आपण कनेक्ट करू शकतो व sd कार्ड मधील माहिती संगकावर बघू शकता.

5.मोबाईल CHARGING करणे :-
                                            OTG CABLE च्या साह्याने आपण आडी अडचणी मध्ये दुसऱ्या मोबाईल च्या बॅटरी च्या मदतीने CHARGING करू शकतो.

6.LAN जोडणी :-
                          BROAD BAND चे LAN CABLE आपण आपल्या स्मार्ट फोन मध्ये LAN OTG CABLE च्या साह्याने इंटरनेट चालवू शकतो.

7.PRINTER जोडणी :-
                                 मोबाईल मधील DOCUMENTS ची जर आपणास URGENT PRINTOUT हवी असेल तर OTG CABLE अतिशय महत्वाचे ठरते.

8.AUDIO SOUND कार्ड :-
                                       ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.

9.GAME CONTROLLER PAD :- 
                                           OTG CABLE च्या साह्याने आपण GAME CONTROLLER PAD मोबाईल ला जोडून हवे ते GAME खेळू शकतो.

10.HARD DISK जोडणी :- 
                                     HARD DISK  हा storage device आहे.मुख्यतःसंगणकात वापरला जातो.परंतु बाजारात usb HARD DISK ऊपलब्ध आहेत.ह्या hard disk ची जोडणी आपण OTG CABLE च्या साह्याने मोबाइल ला करू शकतो.

11.कॅमेराचा DSLR जोडणी :-
                                  Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल

12.USB FLASH LIGHT जोडणी :-
                                                  रात्री लाईट गेल्या नंतर आपण USB FLASH LIGHT चा वापर करू शकतो.

2 comments: