ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

राज्यघटना माहिती

भारतीय राज्यघटनेबद्दल संपूर्ण माहिती

भारतीय राज्यघटनेबद्दल संपूर्ण माहिती


1. लिखित घटना
2. एकेरी नागरिकत्व
3. एकेरी न्यायव्यवस्था
4. धर्मनिरपेक्षता
5. कल्याणकारी राज्य
6. मूलभूत हक्कांचा समावेश
7. मूलभूत कर्तव्यांचा समावेश
घटना समितीतील महत्वाच्या समित्या :
1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू
3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद
4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल
5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल
6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद
7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी
भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :
संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
मूलभूत हक्क : अमेरिका
न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड
लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे

 संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
संघराज्य पद्धत : कॅनडा
शेष अधिकार : कॅनडा

उद्देश पत्रिका :

संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्यांचा उद्देश
2. उद्देशाला संविधानमध्ये किती स्थान देण्यात आलेले आहे जर देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरूस्ती करून त्याची पूर्तता करणे
3. घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो.
उद्देश पत्रिका : "आम्ही भारतीय जनता, भारताच सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना
न्याय : सामाजिक, आर्थिक आणि राजकीय
स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे
समता : दर्जा आणि संधी याबाबतीत
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर, 1949 रोजी विचारपूर्वक ठरवीत आहोत." "व ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य स्वीकृत करीत आहोत."
राज्य व्यवस्थेचे स्वरूप :
1. सार्वभौम : म्हणजे भारत आता इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. अंतर्गत आणि बाह्य परदेशी संबंध निर्माण करण्यास भारत स्वातंत्र्य आहे.
2. प्रजासत्ताक : म्हणजे लोकनियुक्त शासन होय. प्रजासत्ताक राज्यामध्ये अंतिम सत्ता लोकांकडे असते.
3. गणराज्य : म्हणजे राजा नसलेले राज्य होय.
राज्य व्यवस्थेची उद्देश : भारतीय घटनेच्या तिसर्‍या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय घटनेत पुढीलपैकी चार उद्देश उद्देशपत्रिकेत सांगितली आहेत.
न्याय : सामाजिक, आर्थिक, राजकीय
स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना
समता : दर्जा आणि संधी याबाबतीत
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता
41 व्या घटना दुरूस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केलेला बदल :
समाजवादी : हा शब्द या दुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत नमूद करण्यात आला आहे.
धर्मनिरपेक्ष : कोणत्याही धर्माला
अनुसरून राज्यकारभार केला जाणार नाही.
अखंडता : भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही. भारतातील अखंडता टिकून राहील.

No comments:

Post a Comment