ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड म्हणजे काय?


युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.याचा वापर प्रामुख्याने बहुभाषिक सॉफ्टवेअरचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होतो.युनिकोड मानकामध्ये जगातील सर्व लिखित भाषांची सर्व कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता आहे.युनिकोड मानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव दिले जाते.युनिकोड मानक व आयएसओ १०६४६ मानकाची एक विस्तारित यंत्रणा आहे जिला यूटीएफ-१६ म्हणतात ज्यामध्ये जवळपास दहा लाख कॅरेक्टर्सचे एनकोडिंग करता येते.

इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन
 इंटरचेंज(ISCII)म्हणजे काय?
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज(ISCII) हे मानक, सर्व संगणकांमध्ये आणि संवाद माध्यमांमध्ये वापरण्यासाठी तयार केले आहे.यामध्ये ७ किंवा ८ बिट कॅरेक्टरच्या वापराला परवागनगी आहे.८ बिट वातावरणात, खालील १२८ कॅरेक्टर्स माहितीच्या देवाणघेवाणीसाठी निश्चित केलेल्या आयएस १०३१५:१९८२(आयएसओ ६४६ आयआरव्ही) ७ बिट कोडेड कॅरेक्टर संचाप्रमाणे, ज्यांना एएससीआयआय(ASCII)कॅरेक्टर संच म्हणतात त्यामध्ये निश्चित केल्याप्रमाणे आहेत. वरील १२८ कॅरेक्टर्स प्राचीन ब्राह्मी लिपीवर आधारित सर्व भारतीय लिपींसाठी वापरली जातात. ७-बिट वातावरणात कंट्रोल कोड एसआय,आयएससीआयआय(ASCII)कोड सेट मागवण्यासाठी वापरता येतो आणि कंट्रोल कोड एसओ एएससीआयआय(ASCII)कोड संच पुन्हा निवडण्यासाठी वापरता येतात.

भारतामध्ये २२ अधिकृत भाषा आहेत. पर्शियन-अरेबिक लिपींशिवाय भारतीय भाषांसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर सर्व १० लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून निर्माण झाल्या आहेत आणि व त्यांच्या उच्चारांची रचना समान आहे, त्यामुळे कॅरेक्टर्सचा सामायिक संच तयार करणे शक्य झाले आहे. विविध भारतीय लिपी व डिस्प्लेची (प्रदर्शनाची) वैशिष्ट्ये वापरता यावीत यासाठी वैशिष्ट्यांचे एक यंत्रणा देण्यात आली आहे. विस्तार यंत्रणेमुळे आयएससीआयआय (ISCII)कोडसोबत अधिक कॅरेक्टर्स वापरता येतात.

 आयएससीआयआय(ISCII) कोड तक्ता हा ब्राह्मी आधारित लिपींसाठी आवश्यक असलेल्या सर्व कॅरेक्टर्सचा सुपर सेट आहे. सोयीसाठी अधिकृत लिपी देवनागरीच्या मुळाक्षरांचा मानकामध्ये वापर करण्यात आला आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने दिलेला आयएस१३१९:१९९१ हा मानकांसाठीचा क्रमांक माहितीच्या देवाणघेवाणीसाठीचे सर्वात अलिकडचे भारतीय मानक आहे याचा वापर भारतीय भाषांमध्ये आयटी उत्पादनांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर होतो.


युनिकोड आणि आयएससीआयआय कोडमध्ये कोणता मूलभूत फरक काय आहे?


युनिकोडमध्ये १६ बिट एनकोडिंगचा वापर केला जातो जे ६५००० पेक्षा अधिक कॅरेक्टर्ससाठी (६५५३६) कोड पॉईंट देते. युनिकोड मानक प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव देते. युनिकोड मानक जगभरातील सर्व लिखित भाषांसाठी वापरली जाणारी कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता देते. आयएससीआयआय ८ बिट कोड वापरते जो ७ बिट एएससीआयआय कोडचा विस्तार आहे, ज्यामध्ये १० भारतीय लिपींसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत अक्षरांचा समावेश असतो. भारतामध्ये २२ अधिकृत भाषा आहेत. पर्शियन-अरेबिक लिपींशिवाय भारतीय भाषांसाठी वापरल्या जाणा-या इतर १० लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून तयार झालेल्या आहेत आणि त्यांच्या उच्चार रचना समान आहे, ज्यामुळे सामायिक
कॅरेक्टर संच बनविणे शक्य झाले. आयएससीआयआय कोड तक्ता हा ब्राह्मीवर आधारित भारतीय लिपींसाठी आवश्यक सर्व कॅरेक्टर्सचा सुपर सेट आहे. सोयीसाठी देवनागरी या अधिकृत लिपीची मुळाक्षरे मानकामध्ये वापरण्यात आली आहेत.
इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट म्हणजे काय?
इनस्क्रिप्ट (इंडियन स्क्रिप्ट) ही टच टायपिंग कीबोर्ड लेआउट प्रणाली असून, संगणकावर इंडिक मजकूर टाइप करण्यासाठी वापरली जाते. भारत सरकारने या कीबोर्डचे इंडिक संगणनासाठी प्रमाणीकरण केले आहे. इनस्क्रिप्टचा सर्व इंडिक लिपींसाठी समान लेआउट आहे. भारतीय भाषांमध्ये आणि सर्व सहा भारतीय लिपींमध्ये डाटा एंट्री करण्यासाठी इनस्क्रिप्ट (इंडियन स्क्रिप्ट) लेआउट हा डिफॉल्ट पर्याय आहे. हा लेआउट प्रमाणभूत १०१ कीबोर्ड वापरतो. हा ओव्हरले कुठल्याही सध्याच्या इंग्रजी कीबोर्डला साजेसा आहे. कॅरेक्टर्सचे मॅपिंग अशा प्रकारे केले जाते की ते सर्व भारतीय भाषांसाठी (डावीकडून किंवा उजवीकडून लिहील्या जाणाऱ्या) समान असते. याचे कारण म्हणजे भारतीय भाषांसाठीच्या मूलभूत कॅरेक्टर्सचा संच समान आहे. इनस्क्रिप्ट कीबोर्ड विंडोज २०००,XP,VISTA,LINUX,MAC यासह नव्या इनबिल्ट ऑपरेटिंग सिस्टिमसह येतो.
ISM V6 च्या साह्याने COREL DRAW आणि ADOBE PRODUCTS मध्ये युनिकोड टंकलेखन करता येते ?
भारतीय भाषेसाठी Corel आणि Adobe मध्ये युनिकोड अजून साहाय्यभूत नाही.हे उत्पादन युनिकोडशी साहाय्यभूत झाल्यानंतर ISM V6 मध्ये युनिकोड टंकलेखन करता येईल. सध्या Adobe Indesign 6 मध्ये भारतीय भाषेसाठी युनिकोड टंकलेखन करता येते.

No comments:

Post a Comment