ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

चंद्राच्या कला का दिसतात

चंद्राच्या कला का दिसतात?

चंद्राच्या कला का दिसतात?


खालिल चित्रामध्ये पृथ्वी मध्यभागी दाखविली असून तिच्याभोवती चंद्राची प्रदक्षिणा कक्षा दाखविली आहे. तसेच सूर्यप्रकाशामुळे चंद्राची व पृथ्वीची उजवीकडील बाजू प्रकाशीत असून त्यांच्या डाव्या बाजूला अंधार आहे.



पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो तेव्हा त्याच्या पृथ्वीकडील बाजूला अंधार असल्याने आपणास चंद्र दिसत नाही. याच स्थितीला आपण 'अमावास्या' असे म्हणतो. तर जेव्हा चंद्र सूर्यासापेक्ष पृथ्वीच्या पालीकडील बाजूस असतो तेव्हा सूर्यप्रकाशाने त्याची पृथ्वीकडील संपूर्ण बाजू प्रकाशित असते अशा वेळेस पृथ्वीवरून आपणास पूर्ण चंद्रबिंब प्रकाशित दिसते, याच स्थितीला आपण 'पौर्णिमा' असे म्हणतो.

'अमावास्या' ते 'पौर्णिमा' या काळामध्ये चंद्र जसजसा पुढे सरकतो त्या प्रमाणे पृथ्वीवर आपणास दररोज चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित होताना दिसतो. यालाच चंद्राच्या 'कला' असे म्हणतात. पौर्णिमेपर्यंत संपूर्ण चंद्रबिंब प्रकाशित झालेले दिसते. 'अमावास्या' ते 'पौर्णिमा' या काळाला 'शुक्ल पक्ष' असे म्हटले जाते.

तर पुन्हा 'पौर्णिमा' ते 'अमावास्या' या काळामध्ये चंद्र जसजसा पुढे सरकतो त्या प्रमाणे पृथ्वीवर आपणास दररोज चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू कमी होताना दिसतो व अमावास्येपर्यंत चंद्र नाहीसा झालेला असतो. प्रत्यक्षात तो सूर्याच्या जवळ असल्याने व त्याच्या पृथ्वीकडील बाजूकडे अंधार असल्याने तो दिसत नाही. 'पौर्णिमा' ते 'अमावास्या' या काळाला 'कृष्ण पक्ष' असे म्हटले जाते.

वरील चित्रामध्ये पृथ्वीवरून दिसणार्‍या चंद्राच्या कला दाखविल्या आहेत.

No comments:

Post a Comment