ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

प्रकाशवर्ष म्हणजे काय?

प्रकाशवर्ष म्हणजे काय?

प्रकाशवर्ष म्हणजे काय?


खगोलीय गोष्टीतील अंतर प्रचंड असते हे अंतर कि. मी. अथवा मैलामध्ये मोजणे शक्य नसल्याने असे अंतर मोजण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा माध्यम म्हणून वापर केला जाऊ लागला. एखाद्या गोष्टीपासून दुसर्‍या गोष्टीपर्यंत पोहोचायला प्रकाशाला लागलेला वेळ याद्वारे हे अंतर मोजले जाते.

एका वर्षामध्ये प्रकाशाने जेवढे अंतर पार केले त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हटले जाते. प्रकाश एका वर्षामध्ये जवळपास ९, ४६०, ०००, ०००, ००० कि. मी. एवढे अंतर पार करतो.

आतापर्यंत अशी कोणतीही गोष्ट शोधली गेली नाही जी प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असेल. प्रकाश प्रती सेकंद ३, ००, ००० कि. मी. एवढे अंतर पार करतो म्हणजेच एका सेकंदामध्ये प्रकाश पृथ्वी भोवती सात पेक्षा अधिक फेर्‍या पूर्ण करतो. प्रकाशाचा वेग प्रचंड असल्याने दोन तार्‍यांमधील अथवा आकाशगंगांचे अंतर मोजण्यासाठी प्रकाशाचा वेग उपयोगी पडतो.

खालील तक्त्यावरून आपणास प्रकाशाच्या वेगाची कल्पना येईल.

अंतर

प्रकाशाला प्रवास करण्यासाठी लागणार वेळ

पृथ्वी-चंद्र (३, ८५, ००० कि. मी.)

१. ३ सेकंद

सूर्य-पृथ्वी (१४९, ५९७, ८९० कि. मी.)

८ मिनिटे

सूर्यानंतरचा सर्वात जवळचा तारा

४ वर्षे

आकाशगंगेचा व्यास

१ लाख प्रकाशवर्ष

जवळची आकाशगंगा

२२ लाख प्रकाशवर्ष

आपण रात्रीच्या आकाशामध्ये जे तारे पाहतो त्यांची अंतरे प्रकाशवर्षामध्ये मोजलेली आहेत. एखादा तारा आपल्या पासून १०० प्रकाशवर्ष दूर आहे म्हणजेच त्याच्यापासून निघालेला प्रकाश १०० वर्षे प्रवास केल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतो. समजा आता जर त्या तार्‍याचा स्फोट झाला. तर आपणास तो स्फोट १०० वर्षांनी पाहायला मिळेल. याचाच अर्थ आपण जे तारे पाहतो ते तारे भूतकाळातील असतात.

No comments:

Post a Comment