ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

आंतरजिल्हा फॉर्म भरताना ही काळजी घ्या.

 आंतरजिल्हा फॉर्म भरताना आपण खालील प्रकारे काळजी घ्यायला हवी.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पहा.👇


https://youtu.be/frLTxQfkmvw


१)आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहोत त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नोकरी करायची तयारी असणे आवश्यक आहे.अशी मानसिक तयारी करूनच फॉर्म भरा.

२)ज्या तालुक्यात जागा रिक्त असते तिथेच पदस्थापना दिली जाते हे लक्षात असू द्या.वाटल्यास बदली झालेल्या आपल्या मित्रांना याबद्दल विचारा.

३)१०% पेक्षा जास्त रिक्त जागा असल्याने काही जिल्हे (कोकणातील) वगळतात.त्यामुळे दरवेळी समावेश होईलच असं नाही.

४)कोकणातील जिल्ह्यातील शिक्षकांना १०% पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने रिलीव करत नाहीत हे लक्षात असू द्या.

५)पटाआभावी काही जिल्ह्यात शाळा बंद पडत आहेत.

६)२०२४ ला निवडणूक असल्याने भरती प्रक्रिया होईलच.त्यामुळे पर्याय व्यवस्थित भरा.

७)आपल्या मूळ गावावरून आपल्या भरणार असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व तालुके गुगल मॅप वर अंतर मोजा.आणि मग योग्य preference भरा.

८)सरकार कोणता निर्णय कधी घेईल ते सांगता येत नाही, त्यामुळे व्यवस्थित विचार करून फॉर्म भरा.

९)बदल्या ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार होणार आहेत.फॉर्म भरण्यापूर्वी परत एकदा GR वाचा.मे २०२३ चा आंतरजिल्हा बदलीचा GR वाचा.

११)सरकारी धोरणानुसार भविष्यात आंतरजिल्हा बदली व जिल्हाअंतर्गत बदली होणार नाहीत असे शिक्षणमंत्री यांनी 21 जून 2023 च्या GR मध्ये सांगितले आहे. 



No comments:

Post a Comment