ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

कोकण दर्शन



गणपतीपुळे ते मालवण (तारकर्ली तिथेच ६ किमीवर) हा पॅच कव्हर करण्यासाठी तुम्हाला असं करता येईल:
दिवस १: पुण्याहून थेट कोल्हापूर मार्गे मालवण गाठा. गगनबावडा मार्गे गेल्यास मधला पॅच खराब रस्त्याचा आहे पण रस्ता खूप निसर्गसुंदर आहे. घाटातलं सौंदर्य तर खूपच मस्त. त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद वेगळ्या प्रकारे येतो.
काही जणांना स्मूथ फीचरलेस हायवे आणि गाडीचा पिक अप आणि टॉप स्पीड टेस्ट करण्यासाठी गाडी चालवणं हे उत्तम ड्रायव्हिंग प्लेझर वाटतं, तर काहीजणांना वळणावळणाचा जंगलातला रस्ता आणि आजूबाजूला सतत बदलत असलेल्या खाणाखुणा यात आनंद असतो. तुमचा प्रकार ठरवून घ्या. जर कमी वेळ खराब रस्ता हवा असेल तर पुणे कोल्हापूर - निपाणीनजीक उजवे वळण घेऊन आजरा आंबोलीमार्गे मालवण गाठा.. आंबोली टेक्निकली कोकणात नसलं तरी एक रात्र थांबण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. हिरण्यकेशी उगम आणि महादेवगड पॉईंट हे दोनच स्पॉट पाहिलेत तर मुक्काम न करताही बघता येतील वाटेत ब्रेक घेऊन. राहणार असाल तर ग्रीन व्हॅली रिसॉर्ट (एमटीडीसी) किंवा लाड हाऊस हे दोन्ही चांगले आहेत. लाड हाऊस घरगुती आहे (बेड अँड ब्रेकफास्ट)
मालवणला पोचून तारकर्ली बीचवर कोणत्याही बर्‍या दिसणार्‍या हॉटेलात रहा. हे अशासाठी म्हणतोय की तारकर्ली एमटीडीसी रिसॉर्ट हा अगदी बीचवरच आहे आणि ती गणपतिपुळ्याच्या खालोखाल कोकणातली सर्वात सुंदर आणि मोक्याची राहण्याची जागा आहे.. पण दुर्दैवाने त्याचं बुकिंग तुम्हाला मिळण्याची काडीची शक्यता नाही. मी अनेक वर्षं प्रयत्न करतोय. ईअर एंडिगच्या सुमारास तर निव्वळ अशक्य.
बाकी तुम्ही घरगुती अरेंजमेंटचा उल्लेख केलाय, तर इथे तारकर्लीत जेवढी म्हणून ठीकठाक घरं आहेत ती सर्व रहायला भाड्याने दिली आहेत की काय अशी शंका येते. निम्मंअधिक गाव भाड्यानेच गेलंय.
तिथे घरगुती राहण्याची आणि जेवणखाणाची सोय होईलच. फॅमिलीज भरपूर असतात त्यामुळे काळजीचं कारण नाही.
जर तिथे पोचल्यावर घरगुती प्रत्यक्ष पाहून नकोसं वाटलं (एसी नसणं, डास असणं,गाद्या वासाड आणि चादरी अस्वच्छ असणं वगैरे पीडा जाणवल्याने) तर मालवणला चिवला बीचजवळ चिवला नावाचंच नवीन हॉटेल आहे (झांट्ये काजूवाल्यांचं) त्याचा मला उत्तम अनुभव आहे. एसी आणि उत्तम रूम्स असलेलं हॉटेल. रूम सर्विसही चांगली आहे. (टिपः घावणे चटणी ब्रेकफास्टला हवी असल्यास रात्री सांगून ठेवा, म्हणजे दुसर्‍या दिवशी मिळतील.. अवश्य ट्राय करा..)
मालवण/तारकर्ली हाच रात्री मुक्कामाचा "हब" बनवून दिवसा कारने येऊनजाऊन कुणकेश्वर, देवगड, विजयदुर्ग,वेंगुर्ला अशी ठिकाणं दोन दिवसात कव्हर करा. सिंधुदुर्ग किल्ला इथून वॉकेबलच आहे, तेव्हा तो पहा असं वेगळं सांगायला नको. पण पहाटे निघून लवकरच पहा. होडीत बसून तिथे पोचून पूर्ण गड पहायला उन्हात खूप त्रास होतो. विशेषतः चार वर्षाच्या लहानग्यासोबत. रात्रीच्या वेळी मालवण बाजारात मारलेली फेरी हा स्मरणीय अनुभव ठरावा. अगदी तळकोकणातल्या खास चिजांच्या खरेदीने प्रसन्न व्हाल. मालवणी मसाले, खाजे वगैरे न चुकवण्यासारखे..
तिसर्‍या दिवशी लवकर निघून रमतगमत समुद्रकिनार्‍याचा रस्ता पकडून रत्नागिरीपर्यंत या (राजापूरमार्गे मेन रस्त्याने नव्हे.. आतला रस्ता.. जैतापूर-आडिवरे-पूर्णगडकडून थेट पावसला निघणारा.. तिथे पाट्या बघत आणि विचारत निघालात की कळेलच.) या आतल्या रस्त्यावर कोकणचं खरं अप्रतिम रूप पहायला मिळतं. शिवाय साथीला सतत समुद्र राहतो.. फोटोग्राफीप्रेमी असाल तर हा तुम्हाला स्वर्ग वाटेल..
रत्नागिरीत पोचण्यापूर्वी गणेशगुळे असा बाण दिसेल, ते ठिकाण अर्ध्या तासात बघून घ्या..
रत्नागिरीत पावस साईडकडून पोचण्यापूर्वीच भाट्ये लागतं.. आता इथे दोन ऑप्शन्स आहेत.
जर बजेट उत्तम असेल तर कोहिनूर समुद्र रिसॉर्ट मधे त्याच्या अफलातून लोकेशनसाठी रहा.. उंच कड्यावरुन खाली पसरलेला अनलिमिटेड समुद्र. इथे तुमच्या मुलाला आवडेल अशी रिसॉर्टच्या आत फिरायला ट्रेनही आहे. शिवाय कड्यावर टायटॅनिकसारखी बोट बांधली आहे तिथून समुद्राचा थरार कळतो.

नाहीतर मग जरा कमी बजेट असेल तर त्याच डोंगरावरुन उतरुन खाली असलेल्या सुरुबनात असलेला रत्नसागर बीच रिसॉर्ट आहे त्यात रहा. मस्त लाकडी कॉटेजेस आहेत. थेट बीचवरच.. कायम लक्षात राहील असं ठिकाण.
त्या रात्री कुठेच न जाता आणि आराम करा. फारतर संध्याकाळ मिळाली असेल तर रत्नागिरीच्या बाजारपेठेत चक्कर मारुन खरेदी करा.
रत्नागिरीतच दुसर्‍या दिवशी रत्नदुर्ग किल्ला पहा.
तो दिवस पूर्ण रत्नागिरीतच घालवा.. मिर्‍याबंदर, भगवती बंदर, सावरकरप्रेमी असल्यास पतितपावन मंदिर वगैरे बघा.
त्यानंतरच्या दिवशी सकाळी आठ्च्या सुमारास निघून तास दीड तासात गणपतिपुळे गाठा.. इथेही हातखंबा- निवळी - चाफे - जाकादेवी असा रस्ता सरधोपट आहे. पण एक नवीन काहीतरी म्हणून पतितपावन मंदिरासमोरचा (परटवणे) रस्ताच पकडून आतून आतून गणपतिपुळ्याला जाउ शकता. हा खूपच शॉर्टकटही आहे. फक्त रस्ते जरा लहान आहेत.. हाही समुद्राला लागून जात रहातो..
गणपतिपुळ्याबाबतही तेच..अफलातून लोकेशन लाभलेलं आणि अत्यंत सुंदर सोयीस्कर असं एमटीडीसी.. पण बुकिंग मिळणार नाही. ऑनलाईन बुकिंग होतं पण तीनचार महिने आधीच बुक असतं. लक ट्राय करा.. कदाचित ईअरएंडिंगच्या आधी काही दिवस जरा सुट्टीचा मूड कमी असतो तेव्हा म्हणून मिळून जाईल कदाचित.. पण फार आशा नको..

ते न मिळाल्यास अभिषेक म्हणून रिसॉर्ट आहे तो बुक करा.. हा बीचलगत नसला तरी उंचावरुन अमर्याद सी व्ह्यू देणारा आहे.. शिवाय स्टँडर्डही आहे.

खेरीज घनवटकर आणि अन्य गुरुजींच्या सारवलेल्या टिपीकल कोकणी घरांमधे राहण्याखाण्याची सोय होऊ शकते. पण तिथे राहणे किती मानवेल ते आपापले ठरवावे.. जेवणासाठी मात्र पोचल्यापोचल्या घनवटकरांकडे ऑर्डर द्या आणि सात्विक मोदकांचं घरगुती जेवण मिळवा..
गणपतीमंदिराच्या अगदी दाराशी शेडवजा टी हाऊससारखी नाश्त्याची दोनतीन हॉटेल्स आहेत. त्यातल्या एक आणि दोन नंबर हॉटेलांत दर्शनानंतर (किंवा ऐवजी) मिसळ आणि साबुदाणा खिचडी आवर्जून खा आणि नंतर नेहमी आठवण काढा.
गणपतिपुळ्यात मुक्काम टाकल्यावर जवळच असलेलं कोकणचं हेरिटेज दाखवणारं छोट्या डोंगरउतारावर असलेलं संग्रहालय बघा..
मालगुंड आणि भंडारपुळे चुकवू नका..

गणपतीपुळ्याहून सोयीस्कर मार्गाने पुण्याला परत येऊ शकता. वाटेत वाटल्यास परशुराम पाहून, प्रसादाची गरमागरम चविष्ट खिचडी खाऊन कोकणचा निरोप घ्या.. डेरवणच्या शिवसृष्टीत गेलात तर स्त्रियांना ट्रॅडिशनल ड्रेसशिवाय आत सोडत नाहीत हे लक्षात घ्या.. पुरुषांना ही अट नाही..
आणखी काही शंका असल्यास व्यनि करा..
शुभयात्रा..
सर्व फोटो जालावरुन.. तिथूनच लिंक केलेले असल्याने वेगळे तपशील देत नाही..
http://www.misalpav.com/node/19703


कोकण दर्शन (भाग १)छायाचित्र

http://www.maayboli.com/node/30691


दा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाऱ्याची पातळी ४३ डिग्री सेल्शिअसपर्यंत पोहोचली आणि घामाच्या धारांनी अवघी मुंबई न्हाऊन निघाली. साधं घराच्या बाहेर पाऊल टाकायलाही कुणाचं मन धजावत नाहीये; इतका सगळ्यांनी उन्हाचा धसका घेतलाय! पण म्हणून काय. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं नाही? छे! मुळीच नाही. अहो, ‘येवा, कोकण आपलाच आसा’ म्हणत ‘सिंधुरत्न’ अर्थात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे सर्वाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गोव्यापेक्षाही सुंदर समुद्रकिनारे, डॉल्फिनचे दर्शन, स्नॉर्केलिंग, विविध वॉटर स्पोर्टस् तुम्हाला आलेला थकवा नक्कीच पळवून लावतील. मग, घालवायची ना यंदाची ‘सुट्टी पाण्यात?’
विवेक ताम्हणकर

लोककला, साहित्य यांचा स्वतंत्र वारस असलेल्या कोकणाला विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ांना लाभलेला समुद्रकिनारा, हिरव्या माडाच्या बागा, सुंदर खाडय़ा, जलदुर्ग, समुद्रतीरावरील देवालये पाहताना मन भारवून जाते. समुद्रसफरीत होणाऱ्या डॉल्फिन-दर्शनामुळे हा आनंद द्विगुणित होतो. शिवाय इथल्या खास मालवणी जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते, ती वेगळीच! उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली असताना येथील पर्यटन स्थळे आपल्याला माहीत झाल्यास कोकण पर्यटनाचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येईल.
सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे तीन तालुके समुद्रकिनाऱ्यावर आहेत. तीनही तालुक्यांची स्वतंत्र ओळख आहे. देवगड व वेंगुर्ला हापूस आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
देवगड
विजयदुर्ग किल्ला व बीच : विजयदुर्ग हे प्रसिद्ध बंदर आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला किल्ला मराठी आरमाराचे केंद्रस्थान म्हणून ओळखला जातो. ८०० वर्षांपूर्वी राजा भोज याने हा किल्ला उभारला. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केली. सुमारे सतरा एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. इथे वीस बुरुज, देवतांची मंदिरे, तोफगोळे पाहायला मिळतात. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेला हा किल्ला इतिहासप्रेमींना साद घालतो. किल्ल्यावरून समुद्र न्याहाळताना मन प्रफुल्लित होते. समुद्रातील तटावरून डॉल्फिन-दर्शन घेता येते. बाजूलाच सुंदर विजयदुर्ग बीच आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरळे येथून विजयदुर्गला जाणारा ५२ कि. मी.चा मार्ग आहे. वाटेत वाघोटन, पडेल ही गावं लागतात. विजयदुर्ग देवगडवरून २७ कि. मी. अंतरावर आहे.
नजीकचे रेल्वे स्टेशन : वैभववाडी रोड (०२३६७) २३७२५३
राहण्यासाठी : हॉटेल सुरुची (०२३६४) २४५३३५.
देवगड
येथील देवगड किल्ला, बंदर, पवनचक्की व देवगड बीच सौंदर्यात भर पाडत आहेत. इ. स. १७०५ साली कान्होजी आंग्रे यांनी किल्ल्याचे बांधकाम केले. देवगड बंदर वाहतुकीसाठी बंद असून मच्छिमार आपल्या नौका येथे लावतात. सुरक्षित नैसर्गिक बंदर अशी याची ओळख आहे. देशातली पहिली पवनऊर्जा निर्मिती करणारी पवनचक्की येथे पाहता येते. देवगड बीच फारच सुंदर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथून ३८ कि.मी. अंतरावर आहे, तर कणकवलीवरून ५३ कि. मी. अंतर आहे. वाटेत शिरगाव, तळेबाजार, जामसंडे ही गावे लागतात.
नजीकचे रेल्वेस्टेशन : कणकवली, संपर्क ०२३६७-२३२२४३
राहण्यासाठी : हॉटेल रंगोली ९४२२४३६२७८; हॉटेल ग्रीन व्हिला गेस्ट हाऊस ०२३६४-२६२५४०; हॉटेल पारिजात ०२३६४-२६२३०२.
कुणकेश्वर मंदिर
स्थापत्य कलेचा उत्तम नमुना व समुद्रकिनाऱ्यावरील जागृत देवस्थान अशी कुणकेश्वरची ओळख आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. हे तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. देवगडपासून १४ कि. मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्वरच्या आजूबाजूलाही सुंदर बीच आहेत. येथून ३ कि. मी. अंतरावर तांबळडेग बीच आहे. पांढऱ्याशुभ्र वाळूचा किनारा व माडा-पोफळीच्या बागा येथे पाहायला मिळतात.
राहण्यासाठी : कुणकेश्वर भक्तनिवास ०२३६४-२४८६५०, २४८७५०
मालवण
जवळचे रेल्वे स्थानक : सिंधुदुर्ग, कणकवली- ०२३८७-२३२२४३
राहण्यासाठी : हॉटेल सागरकिनारा ०२३६५-२५२२६४; लॉज स्वस्तिक ०२३६५-२५२४२७;
ओटवणेकर हॉलिडे होम ०२३६५-२५२१८८.
तारकर्ली
समुद्री पर्यटनात या बीचने जागतिक नकाशावर स्थान मिळविले आहे. संपूर्ण किनाऱ्यावर वीजप्रकाशाची व्यवस्था आहे. पर्यटन विकास महामंडळाने तंबू निवासाची व्यवस्था केली आहे. हाऊसबोट व स्पीड बोटीतून येथे समुद्रात सफर करता येते. मालवणपासून ६ कि.मी. अंतर आहे. येथून ४ कि.मी.वर सुंदर माडा-पोफळीच्या बागांतील ‘देवबाग’ पाहता येते. अरबी समुद्र व कर्ली नदीच्या संगमावरील देवबाग फिरताना फारच सुंदर वाटते.
राहण्याची सुविधा :
MTDC बांबू हाऊस आणि टेण्ट रिसॉर्ट ०२३६५-२५२३९०;
घर मिठबांवकरांचे ०२३६५-२५२९४१;
सागर दर्शन (देवबाग) ०२३६५-२४८४१४; सुमती रिसॉर्ट ०२३६५-२४८५४३.
स्नॉर्कलिंग, डॉल्फीनदर्शन व हाऊसबोट
मालवणमध्ये एमटीडीसीने स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. मालवण जेटीजवळ याचे बुकिंग होते. किल्ल्याच्या मागील बाजूला खोल समुद्रातील सौंदर्य पर्यटकांना दाखवले जाते. मालवणमध्ये समुद्रसफर करताना तारकर्ली, देवबाग इथे सायंकाळी डॉल्फीनदर्शन होते; तारकर्लीच्या खाडीत हाऊस बोटिंगचा प्रकल्प एमटीडीसीने सुरू केला आहे. याचे बुकिंग एमटीडीसीच्या तारकर्ली पर्यटन निवास केंद्रात होते.
स्नॉर्कलिंगसाठी संपर्क :
अंतोन फर्नाडिस ९९६०४६८६३८;
यतीन मेयर ९९७५५५६४२८;
एमटीडीसी (०२३६५) २५२३९०.
वेंगुर्ले
भोगवे बीच :
सिंधुदुर्गातील सर्वात सुंदर व डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या या बीचवर खाजगी होडय़ांतून समुद्रसफर करता येते. समुद्र पक्ष्यांचे थवे येथे असतात. वेंगुर्लेपासून ३४ कि.मी. तर कुडाळवरून ३० कि.मी.वर भोगवे आहे. वेंगुर्लेवरून म्हापनमार्गे तर कुडाळवरून वालावलमार्गे जायला मार्ग आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन :
कुडाळ- ०२३६२- २२२६०४
राहण्यासाठी हॉटेल सागरदर्शन : ०२३६६- २६९५७०
सागरेश्वर बीच :
वेंगुर्लेपासून अवघ्या तीन कि.मी. वर हा बीच आहे. येथे सागरेश्वर देवाचे सुंदर मंदिर आहे. येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्यपाहता येते. डॉल्फिनदर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध आहे.

निवती बीच :
वेंगुर्लेपासून २८ कि.मी.वर असलेला हा बीच डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांना समुद्रात २ ते ३ कि.मी. आत नेऊन डॉल्फिनदर्शन घडवले जाते. सर्वात मोठय़ा संख्येने येथे डॉल्फिन असतात. येथे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी पाहायला मिळते. येथे निवास व न्याहरी योजना केंद्र आहे.
संपर्क : दिगंबर केसरकर ०२३६६-२८०८१२.
रेडी आणि यशवंतगड
रेडी येथील गणपती मंदिर व यशवंतगड- येथील गणपतीमंदिरात दोन हात असलेली गणेशमूर्ती आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील हे मंदिर धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथून जवळच रेडी खाडीमुखाजवळ यशवंतगड आहे. १६व्या शतकात हा किल्ला शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. वेंगुर्लेपासून ही ठिकाणे २८ कि.मी. तर सावंतवाडीपासून ३५ कि.मी. वर आहेत. येथे निवासाची व्यवस्था नाही.
नजीकचे रेल्वे स्थानक- सावंतवाडी.
वेंगुर्लेमधील निवास व्यवस्था :
हॉटेल सीव्ह्यूव ०२३६६-२६२४७०;
हॉटेल बांबू ०२३६६- २६२२५१;
खंडे कॉर्नर ०२३६६-२६२४९८
सिंधुदुर्गात आजही व्हर्जिन बीच पाहायला मिळतात. निसर्गसौंदर्य जसेच्या तसे येथे जोपासलेले आहे. परंतु सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा होऊन १० वर्षे उलटल्यानंतरही पायाभूत सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे.
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात फारशी पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलपमेंट झाली नसली तरी येथील समुद्रकिनारेही सिंधुदुर्गाप्रमाणेच सुंदर आहेत. गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनस्थळ फार वर्षांपासून प्रसिद्ध आहे.गणपतीपुळे :
प्राचीन कलाकुसरीतील मंदिर व सुंदर मूर्ती असलेले हे ठिकाण फारच सुंदर आहे. लांबच लांब समुद्रकिनारा हे येथील वैशिष्टय़ आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पॅडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथून रत्नागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे ४० कि.मी.चा मार्ग आहे.
जवळचे स्टेशन : रत्नागिरी.
राहण्याची व्यवस्था : एमटीडीसी तंबू निवास.
संपर्क : ०२३५७- २३५२४८.
आंबुळगड
निसर्गरम्य समुद्रकिनारा असलेले हे एक पर्यटनस्थळ असून रत्नागिरीहून ६० कि.मी. वर आहे. पावसमार्गे- नाटेहून येथे जावे लागते.
राहण्यासाठी :
समुद्र बीच हाऊस ९८९२२०८६८७.
नाटे
रत्नागिरीहून ५५ कि.मी. अंतरावरील या बीचवर पावसमार्गे जावे लागते. या ठिकाणी राहण्याची व जेवणाची सुंदर व्यवस्था आहे. अ‍ॅग्रो टुरीझमची संकल्पना गणेश रानडे यांनी राबवून कोकणी पद्धतीची राहण्याची व्यवस्था समुद्रकिनारीच केली आहे.संपर्क : गणेश रानडे ९४२२४३३६७६, ०२३५३-२२५५३६.
भगवती किल्ला :
रत्नागिरीहून १ कि.मी.वर समुद्रकिनारी हा किल्ला आहे. किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य न्याहाळता येते. येथे जवळच रत्नागिरी बंदरही आहे.
रत्नागिरी येथून २० कि.मी. वरील आरेवारे पूल प्रसिद्ध ठिकाण आहे. खाडीवरील या पुलानजीकचा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो

3 comments:

  1. The Best Tourist Places in Kokan to Visit also Know as Kokan Darshan.
    Matheran, Mahabaleshwar, Lonavla, Khandala, Chikhaldara, Toranmal can be visited any time of the year.

    Go to Koynanagar in monsoon and winter. Avoid only during periods of heavy rainfall.

    April-May is the best time to see wildlife in the wildlife sanctuary. But if you want peace, it is better to go in the winter.

    https://trendifyworld.com/kokan-darshan-the-best-tourist-places-in-maharashtra/

    ReplyDelete
  2. Thanks to Manesh Maruti sir for this blog.
    Chhattisgarh

    ReplyDelete