ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

अब्राहम लिंकन

 लिंकन


   
      ●अब्राहम लिंकन●  



```शिकागोच्या सेन पार्कमधील तरुण लिंकनचा पुतळा
अब्राहम लिंकन (फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ - एप्रिल १५, इ.स. १८६५) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सोळावा राष्ट्राध्यक्ष होता (कार्यकाळ: १८६१ ते १८६५) तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. तो अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होता. लिंकन याचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता. युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही गुलामीचे पाठीराखे असणाऱ्या लोकांनी कट करून त्याची हत्या केली.```
*◆₪₪₪●₪₪₪◆₪₪₪●₪₪₪◆*
_*अब्राहम लिंकन एक सेंटवर जन्म व शिक्षण*_

```अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्याचे नाव त्याच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्याचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हँक्स हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्याचे वडील ते त्या भागतील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकिंग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केली गेली आहे. त्याचे वडील मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झालेल्या अशा एका बाप्टिस्ट चर्चचे सदस्य होते. त्यामुळे अब्राहम लिंकनला लहानपणापासूनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. तो स्वतः मात्र वडलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाला नाही.

जमिनीच्या वादामुळे लिंकन कुटुंबाला त्यांच्या जमिनीवरून हलावे लागले. त्यांनी इ.स. १८११ साली जवळच नॉब क्रीक येथे ३० एकर जमीन भाडेपट्टीवर घेतली व तेथे बस्तान हलविले. ही जमिन त्या भागातील उत्तम शेतजमिनींपैकी होती. या काळात लिंकनचे वडील हे एक सन्मान्य नागरीक व यशस्वी शेतकरी व सुतार होते. पुढे इ.स. १८१५ साली जमिनीसंदर्भातील आणखी एका वादामुळे लिंकन कुटुंबाला या जमिनीवरूनही हलावे लागले. या सर्व त्रासास कंटाळून लिंकनच्या वडलांनी इंडियाना राज्यात हलण्याचा निर्णय घेतला. या राज्यातील जमिनीचे केंद्र सरकारने सर्वेक्षण केले असल्याने येथील जमिनींचे कागदपत्र अधिक स्पष्ट व विश्वासार्ह होते. पुढे अब्राहम लिंकनने सर्वेक्षण व वकिली शिकण्यामागे कदाचित या घटनांचा परिणामही असण्याची शक्यता आहे.

अखेर इ.स. १८१६ साली, लिंकन सात वर्षाचा असताना त्याचे कुटुंब इंडियानामध्यी स्पेन्सर काउंटी येथे हलले. लिंकनने हा हलण्यामागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती असे पुढे सांगितले आहे. लिंकन नऊ वर्षाचा असताना इ.स. १८१८ साली त्याच्या आईचा दुधातून होणाऱ्या विषबाधेच्या आजारपणामुळे मृत्यू झाला. लवकरच लिंकनच्या वडिलांनी सारा बुश जॉन्स्टन हिच्याशी दुसरा विवाह केला. लिंकनच्या सावत्र आईने त्याचा स्वतःच्या मुलासारखाच मायेने सांभाळ केला.

आणखी आर्थिक व जमिनीशी निगडित अडचणींनंतर इ.स. १८३० साल लिंकन कुटुंबीयांनी पुन्हा एकदा स्थलांतर केले व इलिनॉय राज्यातील मेकन काउंटी येथे सरकारी जमिनीवर बस्तान हलविले. पुढील वर्षी बावीस वर्षाच्या लिंकनने स्वबळावर जगण्याचे ठरविले व डेंटन ओफुट या व्यापार्‍यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याचे काम न्यू सेलम ते न्यू ऑर्लिअन्स येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. असे मानले जाते की या काळात त्याने न्यू ऑर्लिअन्स येथे गुलांमांचा लिलाव पाहिला व ही घटना त्याच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली.

त्याचे शालेय शिक्षण केवळ १८ महिने विविध शाळांमध्ये फिरत्या शिक्षकांकडून झाले. परंतु हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे त्याचे स्वतःचे स्वतः बरेच शिक्षण झाले. बायबल, शेक्सपियरचे लेखन, व इंग्लिश आणि अमेरिकन इतिहासाचा त्याने खोलवर अभ्यास केला. याच काळात त्याने अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे. खाण्याकरितादेखील प्राणी मारण्याची कल्पना त्याला पसंत नसल्याने त्याने शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही. त्याची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असून तो उत्तम दर्जाचा लाकूडतोड्या व कुस्तीपटू होता.```
*◆₪₪₪●₪₪₪◆₪₪₪●₪₪₪◆*
_*व्यावसायिक जीवन*_

```लिंकनने त्याच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ इ.स. १८३० साली इलिनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. या वेळी त्याचे वय २३ वर्षाचे होते. याच काळात त्याने इलिनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवा केली. या काळात त्याला युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही.

याच काळात त्यानबरेच लहान लहान व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नदेखील केले. त्याने दारु विकण्याचा परवाना घेऊन व्हिस्की विकली. याच काळात त्याने सर विल्यम ब्लॅकस्टोनच्या इंग्लिश कायद्यावरील भाष्य या चार खंडाच्या पुस्तकातील दुसरा खंड वाचला. या पुस्तकाने प्रभावित होऊन त्याने स्वतःचे स्वतःच कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर १८३७ मध्ये त्याला इलिनॉय राज्यात वकिली करण्याची परवानगी मिळाली. याच वर्षी त्याने आपले बस्तान याच राज्यातील स्प्रिंगफील्ड गावी हलविले व स्टीफन टी. लोगन याच्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. लवकरच तो या राज्यातील प्रतिष्ठीत व यशस्वी वकिलांपैकी एक बनला व त्याची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारली.

अब्राहम लिंकनने इ.स. १८३४पासून इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम केले. याच काळामध्ये तो व्हिग पक्षाचा सभागृहातील नेता म्हणुनही काम केले. त्याने इ.स. १८३७ मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिला निषेध केला. या वेळेस त्याने या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हटले.

लिंकनने इ.स. १८४१ साली विल्यम हर्नडॉन या व्हिग पक्षाच्या सदस्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. या दोघांनीही इ.स. १८५६ नव्यानेच सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.```
*◆₪₪₪●₪₪₪◆₪₪₪●₪₪₪◆*
_*लग्न व अपत्ये*_

```अब्राहम लिंकनने नोव्हेंबर ४, इ.स. १८४२ रोजी ३३ वर्षाच्या वयात मेरी टॉड हिच्याशी विवाह केला. या दांपत्यास चार मुले झाली.

रॉबर्ट टॉड लिंकन: जन्म: ऑगस्ट १, इ.स. १८४३, मृत्यु: जुलै २६, इ.स. १९२६.

एडवर्ड बेकर लिंकन: जन्म: मार्च १०, इ.स. १८४६, मृत्यु: फेब्रुवारी १, इ.स. १८५०.

विल्यम वॉलेस लिंकन: जन्म: डिसेंबर २१, इ.स. १८५०, मृत्यु: फेब्रुवारी २०, इ.स. १८६२.

थॉमस टॅड लिंकन: जन्म: एप्रिल ४, इ.स. १८५३, मृत्यु: जुलै १६, इ.स. १८७१.

लिंकनचा अखेरचा वंशज, त्याचा पणतु, रॉबर्ट बेकविथ हा डिसेंबर २४, इ.स. १९८५ रोजी मरण पावला.```
*◆₪₪₪●₪₪₪◆₪₪₪●₪₪₪◆*
_*अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र*_

प्रिय  गुरुजी,
                   
         सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
            नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
            हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
            मात्र त्याला हे देखील शिकवा,
            जगात प्रत्येक बदमाशागणिक    
            असतो एक साधूचरित ,   पुरुषोत्तमही
            स्वार्थी राजकारणी असतात जगात,
            तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
            असतात टपलेले वैरी ,  तसे जपणारे  मित्रही,
            मला माहित आहे !
            सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
            तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
            घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
            आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
            हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
            आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
            तुमच्यात शक्ती असती तर .........
            त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
            आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
            गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
            त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
            जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
            ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
            मात्र त्याबरोबरच ,
            मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
            सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला ,
            पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
            सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
            आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
            शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
            फसवून  मिळालेल्या यशापेक्षा ,
            सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
            आपल्या कल्पना, आपले विचार ,
            यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
            बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
            त्याला सांगा ................
            भल्याशी भलायीन वागावं,
            आणि टग्यांना अद्दल घडवावी .
            माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
            जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
            सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
            पुढे हेही सांगा त्याला ,
            ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
            पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
            आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
            जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
            हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
            आणि म्हणावं त्याला
            आसवांची   लाज वाटू देऊ नको.          
            त्याला शिकवा .........
            तुच्छतावाद्याना   तुच्छ   मानायला ,
            अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
            त्याला हे पुरेपूर समजवा की ,
            करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
           पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
           धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
           कानाडोळा करायला शिकवा त्याला.
           आणि ठसवा त्याच्या मनावर,
           जे सत्य आणि न्याय वाटते,
           त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
           त्याला ममतेन वागवा,
           पण, लाडावून ठेवू नका.
           आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
           लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
           त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
           अन धरला पाहिजे धीर त्याने,
           जर गाजवायच असेल शौर्य .
           आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
           आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
           तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
           माफ करा गुरुजी,
           मी फार बोललो आहे  _
           खूप काही मागतो आहे.........
           पण पहा........
           जमेल तेवढ अवश्य कराच,
           माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.         

No comments:

Post a Comment